Author Topic: विरह  (Read 1189 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
विरह
« on: January 24, 2015, 03:46:50 PM »
सोडून तुला मी जाऊ कुठं?
तु माझा प्राण हे तुला सांगु कसं?
जिंदगीत तुला नेहमीच मागितलं
स्वप़्नात तुला नेहमीच पाहिलं
वर्षानुवर्षाच नातं आपलं
तोडताना तुला काहीच कसं नाही वाटलं
देव दगडाचा पाहला होता
पुजा त्याची केली होती
प्रसन्न करण्या दगडाला
दिवसराञ झगडत होतो
पाहिल एकदा तरी मजकडे
म्हणुन डोळे लावून बसलो होतो
देईल आवाज माझ्या नावाने
म्हणून जगाला विसरून बसलो होतो
न आला देव न आला दगड
पण मात्र आयुष्यभर...
मी स्वतःशीच झगडत बसलो
पाहला होता जो तारा आसमानी
आज हरवला मला एकटे सोडूनी
आज सोबत तु माझ्या नाही
जणू शरीरात ह्रदयच नाही
तहान भुक तुझ्यासंग हरली
आसवे आठवणींची भेट देऊनी गेली
असले जगून मी काय करणार
जेव्हा तु सोबतीला नसणार
फिरत आहे मुडद्यांच्या गर्दीत
शोधत प्रेमाला जिवंत
स्वप़्न रंगलेले पुसून टाकतना
उर भरून आले तुला सोडताना
भविष्यात मी तुझ्या राहणार नाही
जगशिल का तु माझ्या आठवणीत
मरणार मी सदा तुझ्या आठवणीत
प्रेम इतके का करा करावे कुणाला?
खोटी वचने का द्यावी कुणाला?
प्रेमात जळत आहे मी जिवंत
मरण्याचे भय उरले कुणाला?
सोडूनी श्वास माझा
मला सोडूनी गेला
गुदमरल्या चोहिदिशा
जिवंत मला जाळूनी गेल्या...
जिवंत मला जाळूनी गेल्या...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता