Author Topic: व्यथा एका आईची  (Read 1093 times)

Offline Vedanti

 • Newbie
 • *
 • Posts: 34
 • Gender: Female
व्यथा एका आईची
« on: January 26, 2015, 10:24:53 AM »
लोळताना -खेळताना, हसताना-गाताना,
आठवतो रे तू मला मिरवताना….

आला तू पदरात माझ्या जेव्हा,
आनंद गगनात मावेनासा होता रे माझा तेव्हा ….

रागवायची-शिकवायची नि खेळवायची तूला,
कुशीत घेऊन निजवायची तूला….   

कुठे हरवलायस रे माझ्या बाळा,
रागावलायस माझ्यावर नि झाला आहेस ना वेगळा ?

तुझी वाट पाहून थकले रे मी आता,
जीव झाला आहे कासावीस आता….

नको ते ऐश्वर्य नि नको अशी संपदाही,
ज्यात दिसणार नाहीस तू नजरेला एकदाही….

वेदांती आगळे
 
« Last Edit: April 20, 2015, 10:48:30 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: व्यथा एका आईची
« Reply #1 on: January 28, 2015, 01:07:32 PM »
छान रचना ..

saheb

 • Guest
Re: व्यथा एका आईची
« Reply #2 on: January 28, 2015, 01:26:25 PM »
chhan

Offline Vedanti

 • Newbie
 • *
 • Posts: 34
 • Gender: Female
Re: व्यथा एका आईची
« Reply #3 on: February 01, 2015, 11:36:24 PM »
धन्यवाद!!!!