Author Topic: सुटणार रे माहेर...  (Read 1906 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
सुटणार रे माहेर...
« on: January 26, 2015, 06:57:37 PM »

सुटणार रे माहेर...

सुटणार रे माहेर बाबा
तुला मी देवू कसे अंतर ।।धृ।।

निरोप देण्या तयार सारे
जावू कशी सोडून बापडी?
काळजी मला तुझीच बाबा
भेटण्या तुला मी आतूर /1

सुटणार रे माहेर बाबा
तुला मी देवू कसे अंतर ।।धृ।।

अंगण झाले पर्वत मजला
झाला उंबरा जणू परदेस 
सोडता घर आपुले बाबा
उसळते आज मनी काहूर /2

सुटणार रे माहेर बाबा
तुला मी देवू कसे अंतर ।।धृ।।

करता प्रवेश नव्या व्दारी
जरी घर स्वर्ग प्रियाचे
उबदार छत तुझेच बाबा
लाभो मजला ते निरंतर /3

सुटणार रे माहेर बाबा
तुला मी देवू कसे अंतर ।।धृ।।

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता