Author Topic: मन उदास उदास  (Read 1107 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
मन उदास उदास
« on: January 31, 2015, 07:10:20 PM »
मन उदास उदास
झाला दुःखाचा दास
देते त्याला धीर
आतून,एक एक श्वास ! !

लई दुःखाचा त्रास
मना सुखाची आस
सुख शोधता शोधता
लागे दुःखाचा फास ! !

मना सुखाचीच गोड
त्याला दुःख आले आड
दुःख सुटता सुटेना
येईना सुखाला मोड ! !

मन झाले वाहटोळ
फिरे रानो रान
सूखाच्या शोधात
सांगे दुःखाच गऱ्हानं ! !

सुख शोधता शोधता
मन झाले लहान
सूखाच्या लोभापुढे
आत्मा ठेवला गहाण ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता