Author Topic: वाट  (Read 775 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
वाट
« on: February 01, 2015, 08:27:28 PM »
अगं ए चटकचांदणे
तुला पाहताच वाढली
ह्रदयाची स्पंदने...
तुझ्या आठवणीत मी
बाभुळ झालो आहे
तुझ्या आठवणीत मी
नुसताच वाढत आहे...
शरीरावरील खपल्या
आता गळूण पडल्या
सुटल्या बारा फांद्या
टेकतात नभाला...
पिकली सारी काटे
अन् पिकली आता पाने
पण तरी तुझ्या प्रेमाची
वाट मी पाहतच आहे...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता