Author Topic: तुला शोधतो मी  (Read 1350 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
तुला शोधतो मी
« on: February 07, 2015, 09:33:19 AM »
तुला शोधतो मी प्रत्येक चेहऱ्यात
दिसेल त्या ह्रुदयात ; दिसेल त्या मनात
दऱ्या खोऱ्यात ; घुटमळनाऱ्या वाऱ्यात !
निर्मळ पाण्यात ; वाहणाऱ्या झऱ्यात !
डुलणाऱ्या झाडात ; झाडाच्या पानात !
प्रत्येक क्षणात ; प्रत्येक श्वासात !
घनदाट वनात ; ओसाड रानात !

गाणाऱ्या पाखरात ; अथांग सागरात !
तुलाच बघतो ; तुलाच शोधतो !
तुलाच जाणतो ; तुलाच मानतो !
तुझ्याच प्रेमात न्हातो ; तुझेच गीत गातो !
तुझेच स्वप्ने पाहतो ; तुलाच स्मरतो !
तू कशी हसते ; तू कशी दिसते !
तू कशी चालते ; तू कशी बोलते !
मनामधे उठते काहूर ; जेंव्हा लागते तुझी चाहूल !
तू असणार चंद्रासारखी !
तेजमय ताऱ्यासारखी !
वाहणाऱ्या वाऱ्यासारखी !
माहीत आहे या मना
तू भेटणार नाही ; तू बोलणार नाही !
तू दिसणार नाही ; माझ्या  जीवनात येणार नाही !
तरीही हे वेडे मन तुलाच शोधते !
शोधतच राहते !
शेवटच्या श्वासापर्यंत !

एक अधूरी कहानी
जिच्यात धूर आहे पण आग नाही !
विस्तव आहे पण राख नाही !
रस आहे पण पाक नाही !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


अचला

  • Guest
Re: तुला शोधतो मी
« Reply #1 on: February 17, 2015, 08:56:02 AM »
जिच्यात धूर आहे पण आग नाही!
विस्तव आहे पण राख नाही!

की राख आहे पण विस्तव नाही?
असो ते कसेही, राख माझी याद
होऊन जाता मी बेचिराख.