Author Topic: ठाव  (Read 572 times)

Offline anuswami

  • Newbie
  • *
  • Posts: 20
ठाव
« on: February 14, 2015, 09:03:44 AM »
**  ठाव  **


वाटेवरून चालत जात होतो
प्रेमाचे धागे नकळत तू गुंफले
सावरत होतो मी तोल मनाचा
मन नकळत तुझ्या प्रेमात गुंतलेतुझी आठवण यावी दररोज किती
कधीच नसायच गं याच माप
नजरेस माझ्या ना पडली तू
की व्हायचा नुसता हृदयाचा थरकापआलीस का तू जीवनात माझ्या
ना केला मी कधी हा प्रश्न
प्रेमगीत तुझेच गात होतो
तू मुकी राधा अन मी बोलका कृष्णविसरून जा तिला आता तू
सवंगडी मला नेहमीच म्हणतात
तुझ्या आठवणी बोचतात हृदयाला
नयनी अश्रुधारा वाहू लागतातसाथसंगतीत जपलेल्या क्षणांना
मी कसं काय विसरु शकेन
तुझ्या आठवणीतच जाणार हे जीवन
अन तुझ्याच प्रेमात मी जगून उरेनसमजत नाही आजही मला
कसा मांडलाय तू हा डाव
गुंतवून प्रेमात रडवतेस मला रोज
कधीतरी घे माझ्या मनीचा ठाव.....


- कवी : अनिकेत स्वामी, अकलूज
asswami0143@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता