थोडा वेळ जावा लागणार आहे
भेट होता तुझी वाटले असे
जन्मजन्मांतरीचे नाते गवसले जसे
आज दूर जाताना मन आवरत नाही
भावनेच्या पुराला बांध घालण्याचा
फसवा प्रयत्नही ते करत नाही
भेटलीच नसती तू जर
काहीच फरक पडला नसता
भेटून निघून जाण्याने मात्र
तिळ तिळ काळीज जळणार आहे
शरीराच्या जखमा लवकर भरतात
मनाच्या जखमा भरायला मात्र
वेळ जावा लागणार आहे
थोडा वेळ जावा लागणार आहे
-अमोल मांगलकर