Author Topic: दाह फुल  (Read 502 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
दाह फुल
« on: February 24, 2015, 01:14:32 AM »
दाह फुल

काचेवरून दव थेंब
हलकेच जो घरंगळला,
क्षण सारे विखुरलेले     
आठवुन आले मनाला !

घेऊन दाह फुलायचे
अधीन जीणे पांगारीला,
रंगुनहि तांबुस केशरी
मान त्या नसे पुजेला !

असे ग्रीष्म पानगळ
सोबत एकाकी वाटेला,
तेंव्हा वेदना विरहाची
छळते शुष्क फांदिला !

लाडका प्रियतम मुरारी
भुरळ पाडीतो राधेला,
आर्त सुर तो मिरेचा
व्याकुळ करी संधेला
!

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता