Author Topic: आम्ही कोण ?  (Read 649 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
आम्ही कोण ?
« on: February 27, 2015, 08:08:23 PM »
आम्ही कोण ? ते पण एकदा सांगून द्या
पाहिजे ते देईन एकदा तरी मागून घ्या

आमची भूमी , सत्ता गाजवणार तुम्ही
फाशी घेण्या दोर, तेवढा तरी आणून द्या
आम्ही कोण ? ते पण एकदा सांगून द्या

खत वाढवल , बी वाढवल
महागाईच तर सोडूनच द्या
आम्ही कोण ? ते पण एकदा सांगून द्या

बारा महीने कष्टकरी , आम्ही जातीचे शेतकरी
आमच्या मुलाबाळा पण शिक्षण द्या
आम्ही कोण ? ते पण एकदा सांगून द्या

सरकार कुणाचं , गरीबांच का व्यापाऱ्याच
ते पण आम्हा कळून द्या
आम्ही कोण ? ते पण एकदा सांगून द्या

शहरातून शहरात जाण्या , फास्ट रेलवेची योजना
आमच्यासाठी तूटकी मुटकी एस टी तरी पाठउन द्या
आम्ही कोण ? ते पण एकदा  सांगून द्या

एक तरी पुरवा सादा , तुम्ही केलेला वादा
नाही तर सुखाश्री खातो आम्ही ते तरी खाऊन द्या
आम्ही कोण ? ते पण एकदा सांगून द्या


शेतकऱ्याच पोर

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता