दिवस आपल्या प्रेमाचे
लहानपनी तू अण् मी
दोघे सोबतच खेळायचो
कधी तू मला हसवायची
तर मी तुला रडवायचो
हातात हात घेऊन
आपन सोबतच फिरायचो
तुझं माहीत नाही,
पण मी तुझे स्वप्ण नेहमीच बघायचो
सकाळी उठल्यावर, मला सवय
तुझ्या घराकडे बघायची
कारण तू ही तेव्हा
रांगोळी टाकत बसायची
मी दीसलो तुला
तर गालातच हसायची
अण् बघुनही माझ्याकडे
न बघीतल्यागत करायची
पाणी भरण्यासाठी
मी तुझ्याच घरी यायचो
घागर नळाला लावुन
तुझाच विचार करायचो
विचार करता करता तुझा
घागर भरुनही जायची
अण् पाय ओले झाल्यावर
घागर भरल्याची जाणीव व्हायची
घरी परतायला लागलो
तर हाक तू द्यायची
अण् थांबलो नाही मी
तर लपुन रडायची
बघता बघता आपण
दोघेही मोठे झालो
कळत नकळत
प्रेमातही पडलो
पण आपल्या प्रेमावर
तुझ्या घरच्यांचा नकार होता
कारण माझा ऊंबरठा मातीचा
अण् तुझा सोण्याचा होता.
शैलेश मेश्राम