Author Topic: सोमवार आला की,  (Read 759 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
सोमवार आला की,
« on: March 02, 2015, 02:31:38 PM »
सोमवार आला की
माझ मस्तक फिरतं
रागाच्या भरात
अथुरणावरच लोळतं !!

दोन दिवसाचा आराम
बनून बसतो हराम
आठवतात पुन्हा
बॉसच्या शिव्या अन् काम
उठतो धडपडत
पुन्हा डोळे चोळत !
रागाच्या भरात, अथूरणावर लोळत !!
दिसतं डोळ्यासमोर
सारे काम पेंडिंग
Hi hello करत
करतो सर्वां सेंडिंग
नका जाऊ पप्पा कामा
बोलते पोरगं रडत !
रागाच्या भरात, अथूरणावर लोळत !!

बीमार आहे आज
वाटलं बॉसला टाकावे बोलून
 बीमार आहे colleaque माझा
आवाज येते मोबाईल मधून
माझीच युक्ती मला
दुसऱ्यानी सांगितली चोरत
 रागाच्या भरात,अथूरणावर लोळत !!

ऑफीसला जाण्याच्या गडबडीत
बायकोला उठवायचे चुकलो
बायकोच्या आळसपणामुळे
दिवसभर डब्याला मुकलो
झोपेतूनच ऑर्डर दिली
बिनाऑइली बसा चघळत
रागाच्या भरात,अथूरणावर लोळत !!


संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता