Author Topic: प्रेरणा तुझी  (Read 678 times)

Offline kshitij samarpan

  • Newbie
  • *
  • Posts: 9
प्रेरणा तुझी
« on: March 05, 2015, 12:26:49 AM »
प्रेरणा  तुझी ,

नजरेतून नजर तुज्या ,
 नजरेस  मिळवण्याची आस  आहे ,
तुझ्या सोबत प्रीत  व्हावी म्हणूनच ……
  जन्म तुझा, नि  माझा झालेला  आहे ,

तुझ्याशिवाय न सुचेल, ते विचार कसले?
ज्या विचारांत तु  नाहीस ,असे  मला सुचेल तरी कसे ?

कधी  काळी  आपण , आपलेच प्रतिबिंब
एकमेकांना  मानलेले  होते ..........
न जानो, तुझे प्रतिबिंब माझ्यापासून
आज  वेगळे होऊ  लागले कसे ?

 मला  न सांगता, जे तु केलेस
ते मला  जाणवू  लागले कसे ?

तू आणि मी तर दोन  शरीर  असून ,
एकच होतो ,
तरी  अंधारात ही तू माझ्या सावलीस
वेगळे  करू  शकलीस कसे?

मनामध्ये येणारे विचार तु, मी  ,
बोलण्या आधीच ओळखणारी तू.……… ,
आज  तुला मनाचे माझ्या टुकड़े  करून,
त्यातील तुझे नाव वाचणे जमले  कसे ?

माझे नाव जरी तुझ्या कानी पडले,
तरी लाजुन  हसु फुटलेली तू,……
   माझा चेहरा ,माझी  ओळख ,विसरून तुला,
 आरश्यात स्वता:ला नजर  मिळवणे  जमले कसे ?

जे काही लिहु शकलो त्याला कोणी
वाह वा ,वाह वा केले। ..........
तरी तुझ्या  मुळे मिळालेल्या
ह्या  प्रेरणेस साजरे  करू तरी कसे ?क्षितीज समर्पण

« Last Edit: March 09, 2015, 10:41:37 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline hrishi gaikwad

  • Newbie
  • *
  • Posts: 35
  • Gender: Male
  • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
    • hrishigaikwad.blogspot.in
Re: prerana tujhi
« Reply #1 on: March 07, 2015, 10:18:19 AM »
Great.......