Author Topic: सैरभैर  (Read 475 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
सैरभैर
« on: March 06, 2015, 11:35:00 AM »
सैरभैर

सैरभैर करी मन, तुझी आठवण
शोधु कुठ तुला सखे, झालो बैचेन !!

सुचेना काम धाम, जडलं तुझ ध्यान
पाखरा गत झालं माझ, फिरतोया रान !!१!!
सैरभैर करी मन....

जीव माझा कासाविस, ये ग परतुन
प्रियतम माझ्या तुला, प्रितीची आन !!२!!
सैरभैर करी मन....

विसरू कसं सये, रूप तुझ छान?
कसा राहे दुर जीव, तु माझा प्राणं !!३!!
सैरभैर करी मन....

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता