Author Topic: आठवण तिची येता...  (Read 1774 times)

Offline hrishi gaikwad

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Male
 • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
  • hrishigaikwad.blogspot.in
आठवण तिची येता...
« on: March 07, 2015, 07:22:16 AM »
आठवण तिची येता;
मना वेगळीच चाहूल लागते,
नि:शब्दी ओठी;
एक कविता जुळूण येते...

शब्द सारे ओठांतच अडकतात;
समोर जेव्हा ती दिसते,
पाहता तिला वाळवंटी रानी;
नाजुक कळी फुलते...

स्वप्नफुलांची बाग;
मग अशी बहारते,
तिच्या प्रेमळ स्पर्शाने;
फुल न फुल गंधाळते...

गंधाळलेल्या रानी ती ;
फुलपाखरा गत भासते,
देखणे सुःखद रूप तिचे;
माझिया मना भूलवते...

तिच्या डोळ्यांतली नशा;
मला बेहोश करुण जाते,
सगळे काही विसरवूण मला;
ती स्वप्नात नेवूण पोहचवते...

पापण्यांनखाली हलकासा ओलावा जाणवतो;
जेव्हा फसवे स्वप्न हे माझे मोडते,
अन् तिच्या आठवणीने;
मन पुन्हा एकदा गहिवरते....

Marathi Kavita : मराठी कविता


शेवंती

 • Guest
Re: आठवण तिची येता...
« Reply #1 on: March 15, 2015, 10:42:49 PM »
तिच्या डोळ्यांतली नशा;
मला बेहोश करुण जाते,
सगळे काही विसरवूण मला;
ती स्वप्नात नेवूण पोहचवते...


अन् तिच्या आठवणीने;
मन पुन्हा एकदा गहिवरते....करुण काव्य मी हे वाचते
अन मन माझे गहिवरते

Offline hrishi gaikwad

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Male
 • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
  • hrishigaikwad.blogspot.in
Re: आठवण तिची येता...
« Reply #2 on: March 17, 2015, 12:34:57 AM »
गहिवरलेल्या मना
कवितेचाच सहारा....