Author Topic: अरे मर्द मावळ्यानो षंड झालात का?  (Read 742 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
अरे मर्द मावळ्यानो षंड झालात का ?
विझलेल्या आगीची राख होऊन थंड झालात का ?
अडकून जातीच्या बेड्यात मंद झालात का ?
अरे मर्द मावळ्यानो षंड झालात का ? ! !

भिक्षुकशाहीचे जोखड अडकवून खांद्यावर
तुम्हीच खतपानी घालितां त्या आंधळ्या धंद्यावर
करून तुम्हा गुलाम ते बसले तुमच्या छाताडावर
अंधश्रद्धेचा फास त्याने घातीला तुमच्या गळ्यावर
 अडकून त्यांच्या जाळ्यात तुम्ही अंध झालात का ?
अरे मर्द मावळ्यांनो षंड झालात का ? ! !

जातीच्या नावावर नेत्यांनी चालू केला धंदा
अडकवीला त्याच्यात हरएक नौजवान बंधा
दलित,हिंदू,मुस्लिम नावाचा हातात त्यांच्या फंडा
स्वतःच्या स्वार्थापायी समाज केला सारा गंदा
होते कधी छावे तुम्ही आता कोंबडीचे अंड झालात का ?
अरे मर्द मावळ्यानो षंड झालात का ? ! !
मूडद्या प्रमाणे पडले तुम्ही अधोगतीच्या खड्यात
जातीवादाचे विष ओतीले पुढाऱ्यानी तुमच्या नरड्यात
भिक्षुकशाहीने ठेवले तुम्हा गुलामगिरीच्या नरकात
सापा प्रमाने आडवा पडला तो तुमच्या जीवनात
तुमच्या माणसातल्या माणूसकीचा आता अंत झाला का ?
अरे मर्द मावळ्यानो षंड झालात का ? ! !


संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


Rajshri kahate

  • Guest
khup chhan kavita aahe..jay maharashtra..shivaji maharaj ki jay...