Author Topic: का कुठुन दाटले घन मनात ?  (Read 1472 times)

Offline sachinikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 162
  • Gender: Male
का कुठुन दाटले घन मनात ?
« on: March 23, 2015, 03:52:05 PM »
का कुठुन दाटले घन मनात ?

का कुठुन दाटले घन मनात ?
कसा पडला काळोख लख्ख उन्हात
का कुठुन पेटला वणवा उरात
कसा अडखळला श्वास  गाताना सुरात

काय कसे हे विपरीत घडले
अघटित सारे शोकसागरात बुडले
का कशी क्षणभर स्पंदने थांबली
सरेना दिन नि रात्र अजूनच लांबली…

का कुठुन दाटले घन मनात ?
कसे गोठले अश्रू तप्त उन्हात
कुठून घोंगावले वादळ काळजात
कसा दुरावला स्पर्श मायेचा
घर करून हृदयात…
घर करून हृदयात…

----------
कवितासंग्रह : मुग्धमन
कवी: सचिन निकम
पुणे
sachinikam@gmail.com


« Last Edit: June 10, 2015, 09:34:37 AM by sachinikam »