Author Topic: मला चुकीचं ठरवलं...  (Read 784 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 231
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
मला चुकीचं ठरवलं...
« on: April 01, 2015, 12:59:46 PM »
मला काय वाटलं,
तर तुला काय वाटलं..
चुकीचं मी तुला ठरवलं तर,
तू मलाच चुकीचं ठरवल..!!

खोटे आळ येडू आतातरी,
माझ्यावर तु लावू नकोस..
वेदना होतात या मला,
तू असं मला दुखवू नकोस..!!

माझ्या डोळ्यांच्या आरशात,
जर शोभत नाहीत अश्रू..
तर छेडु नकोस मला,
अन असं रडवूही नकोस..!!

असशील तू कोणा दुसऱ्‍याची,
कदाचीत माझी नसशीलही..
जरी हे खरं असेल तरी,
तू मला ते सांगू नकोस..!!

आता तरी खरी किंमत लाव,
माझ्या तुझ्यासाठीच्या स्वप्नांची..
नाहीतर तु कोणतच स्वप्न,
मला दाखवूतरी नकोस..!!

आता तर आलीस अन् भेटलिस,
अन् ऐवढ्यातच निघालिस..
फक्त एक करार पाळण्यासाठी,
नाईलाजाने मला भेटू नकोस..!!

तुझ्यावर प्रेम केलं नसतं तर,
जीवन मला सापडल नसत..
तुझ्यावाचून दिशाहीन मी,
आयुष्य माझं धडपडल असतं...!!

तुझ्यावर प्रेम केलं नसतं तर,
यशाचं शिखर दिसलं नसत..
तुझ्यावाचून अपूर्ण मी,
आयुष्य माझं गडगडल असतं...!!

तुझ्यावर प्रेम केलं नसतं तर,
ह्रदय माझं धडधडल नसतं..
तुझ्यावाचून कसा जगू मी,
ह्रदय माझं तडफडल असतं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

Marathi Kavita : मराठी कविता