कधी झालोचं नाहीतरी
हे तुझं-माझं पहीलं प्रेम
आठवणीत तेवढ राहु दे

प्रेमाला पुजतो मी देवासारखा,
तुझाही खुप आभारी आहे,
पुढचा प्रत्येक जन्म माझ्यासाठी
हा जन्म झाल्यास उधारी आहे
तुझ्या ह्रदयात मी नेहमीच आहे,
नाहीच तर मग पायापाशी तरी राहु दे!
आतापासुन मनाची तयारी करतोय,
तुझ्या घरून येणा-या निर्णय ऐकण्याची,
आतुरतेने वाट पाहतोय,
अंधुक निर्णायांची नाव संभाळतोय,
सारचं शब्दात सांगत नाही आता
थोड तुलाही कळू दे!
कुंकवाचा टिळा तुझ्या
माथी लावून एकदा,
स्वतःच्या हाताने तुझ्या
गळ्यात मंगल धागा बांधायचा आहे
सप्तपदी चालायची आहे तुझ्यासोबत
एवढं लक्षात राहू दे!
तु सोबत नसशील कधी,
पण तु फक्त माझीचं आहेस्,
माझा श्वाससुद्दा तुझ्या मुठीत,
तुच पहीलं प्रेम आहेस्..
जगापाशी सिद्ध करायची गरज नाही
हे तुला एकदा कळु दे!
तु अन् मी दुर होणं नाही,
पण कधी दुर झालोचं तर...
मी दिलेल्या आपलेपणाला
अडगळीच्या खोलीत टाकू नकोस,
प्रेमाचा ओलावा असलेल्या
ह्रदयाच्या राखीव कप्प्यात राहू दे!!
दुर झाली कधी माझ्यापासून तरी
माझी आठवण तोडी राहू दे!!..
