Author Topic: टेकडी वरचं झाड...  (Read 811 times)

Offline Rohi.. fakt tujhya sathi...

  • Newbie
  • *
  • Posts: 5
टेकडी वरचं झाड...
« on: April 09, 2015, 03:07:21 PM »

टेकडी वरचं झाड ,
त्याच हिरवं हिरवं पान...दिसेनास झालय...
संतापलेला सूर्य आता ,
माथ्या वरती आलाय...

गेलेला क्षण ,
माझं रुसलेलं मन,
झालं ढगाळ ढगाळ....
भर उन्हात मनावरती,
काळे आभाळ आभाळ...

उन्हातल्या झळा,
प्रेमातला विरह,
सोसेनासा झालाय...
भर उन्हात मनावरती,
अवकाळी पाऊस आलाय....

विरह कविता तुझ्या माझ्या प्रेमाची,
प्रेमात आलेल्या दुष्काळाची...
created by Rohi....

Marathi Kavita : मराठी कविता