अंगावर घेऊन पावसाच्या सारी....
मनी अंगणात प्रिती न्हाउली
रोमांच दाटुनी अंगामध्ये
लपली ढगाआड साउली
अंगावर घेऊन पावसाच्या सारी....
मन माझे ओसंडून जाई
प्रिती आठवणीच्या संगे
मी रानात एकटाच गात जाई
अंगावर घेऊन पावसाच्या सारी....
मन मुकाट हुंदके देई
नयन आसवे दव होऊन
तव ह्रिदयाला स्पर्श करी
अंगावर घेऊन पावसाच्या सारी....
जीव आकांतेने तुज शीळ घाली
आता तरी ये !
एकटाच फिरत आहे रानो-माळी
अंगावर घेऊन पावसाच्या सारी....
देह सोडला, तुझी आस सोडली
पाहत रडतेस का माझ्या सरणा
अंगावर घेऊन पावसाच्या सारी....
snl_1408@yahoo.com
rudrakambli@gmail.com
sunil (rudra) kambli.