Author Topic: सारे रक्ता रक्तात वाटले  (Read 580 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260


जाती धर्माने साऱ्या
 मानवास छाटले
कुणी उच्चभू थाटले
कुणी मात्र बाटले
या धर्माच्या द्वेषाने सारे
रक्ता रक्तात वाटले
रक्ता रक्तात वाटले ! !

येथे माणूस गोड नाही
येथे जात गोड आहे
येथे एकीची जोड नाही
येथे जातीची ओढ आहे
येथे आस्तिक हासले
नास्तिक मात्र त्रासले
या धर्माच्या द्वेषाने सारे
रक्ता रक्तात वाटले ! !

ना माहीत कुणा
येथे एकोप्याचा कर्म
सारेच पाळीतात
आपआपला धर्म
धर्म त्यांचा सखा
धर्माचेच करती कर्म
धर्माचिच असे गोडी
धर्मच त्यांचा मर्म
जाती धर्माचे जाळे आजवर
भिक्षुकशाहीने थाटले
या धर्माच्या द्वेषाने सारे
रक्ता रक्तात वाटले ! !

येथे धर्माच्याच होती दंगली
 येथे धर्मच साऱ्याला भंगली
येथे धर्मातच सारे रंगली
धर्म जातीचीच युक्ती दिसे चांगली
 जाती धर्मासाठी साऱ्यानी
माणुसकीलाच कापले
या धर्माच्या द्वेषाने सारे रक्ता रक्तात वाटले ! !


संजय बनसोडे