Author Topic: अंधश्रद्धेच जोखड  (Read 523 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
अंधश्रद्धेच जोखड
« on: April 28, 2015, 06:03:15 PM »
ना त्याला जान ना भान
फक्त तो पाषाण
घेतो कोण बघ मुर्खा
जे करतो तू दान ! !

हजारो लिटरच्या सरी
त्या पाषाणा ओतण्या परी
कर खरा दान धर्म
दे कुपोषित मुलाच्या घरी ! !

देव असते फक्त नावाला
कागदाच वेड कुण्या देवाला ?
कसले पुण्य अशा दानाला
विचार जरा तुझ्या मनाला ! !

दगडावर ठेऊन मस्तिक
समजी स्वतःला आस्तिक
सोड अंधश्रद्धेच जोखड
बन विज्ञानवादी नास्तिक
अन्
हो खऱ्या मानव धर्मात स्थित
हो खऱ्या मानव धर्मात स्थितसंजय बनसोडे
9819444028


Marathi Kavita : मराठी कविता