Author Topic: का कुणास ठाऊक...?  (Read 1007 times)

Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
का कुणास ठाऊक...?
« on: May 24, 2015, 03:35:44 PM »
का कुणास ठाऊक...?
खूप रडावसं वाटतयं आज, तुझ्या आठवणीत स्वत:ला विसरून जावसं वाटतयं आज...!

का कुणास ठाऊक...?
सरणार्या प्रत्येक क्षणाबरोबर तू ही दूरावतोयस...
इतकं असूनही माझ्यात फक्त तूच उरतोयसं...

का कुणास ठाऊक...?
खूप आठवण येते रे तुझी, खूप बोलावसं वाटतंय...       
पण शब्दच सुचत नाहीत...

का कुणास ठाऊक...?
एकही क्षण असा नसतो की तुझी आठवण येत नाही...
कितीही ठरवलं तरी तुला विसरता येत नाही...

का कुणास ठाऊक...?
का भेटतात अशी माणसं...जी आपली होणारच नसतात...
जितक्या सहज आयुष्यात येतात तितक्याच सहज निघुनही जातात...!

अन् उरताे फक्त रितेपणा... !!!

का कुणास ठाऊक...? का होते असे....?


Archana...!

Marathi Kavita : मराठी कविता