Author Topic: तुला काय वाटतं.मी मिस् करतोय तुला...  (Read 1349 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
तुला काय वाटतं...
मी मिस् करतोय तुला...
.
ह्टआठवण येते थोडी बस्स
बाकी काही नाही...

सकाळी उठल्यापासून, झोपेपर्यंत
तू मला अजिबात आठवत
नाहीस ..
.
आरशात एकट्याला पहायला
त्रास होतो थोडा, बस्स
बाकी काही नाहीय...
.
दुपारी जेवायला बसल्यावर घास
थांबतो ओठांजवळ
पण भाजी बरोबर नसते यार
खानावळीची...
.
तोंड अळणी होतं थोडं,
बस्स खरंच तुला मिस् नाय
करत मी...
.
खरंय आता एकट्याला रफी,
गिता नको वाटतात...
.
पण लाऊडस्पिकर लावतो मी
रात्री जीव
दंगला गुंगला ऐकताना,
थोडी हूरहूर होते बस्स !
बाकी काही नाही...
.
माझा मोबाईल गंडलाय डब्बा
झालाय त्याचा हे आता तु न सांगताच समजतंय मला
साला...
.
कधी पण तुझी रिंग वाजवतो तो
गंडलाय, पण
मी नाय गंडलो मेमरी थोडी विक
झालीय, बस्स ...
.
रात्री न जेवता उंबऱ्यात गेल्यावर,
काहीतरी आठवतं..
बंद दारापुढे डोळेही बंद होतात...

तुला अजिबात मीस नाय
करत मी...

रात्री बेडवर पडल्यावर उशीवर
पापण्या भिजतात
पाण्यानं...
.
अलिकडं घरातही दव पडू लागलंय
बहुधा मी खरंच
सांगतोय,
अजिबात मिस नाही करत तुला...
.
तुला काय वाटतं...
मी मिस् करतोय तुला...

ह्ट थोडी आठवण येते बस्स !
बाकी काही नाही...!

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता


Arvind kute

  • Guest
Lay bhari!!. Dear prem sir mala pan kavita karayla khup aawadtat plz tell me how to join this page for publish poems

Arvind kute

  • Guest
arvind.kute90@gmail.com

prabhawati

  • Guest