Author Topic: सगळं राहूनच गेलं....  (Read 1200 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
सगळं राहूनच गेलं....
« on: June 15, 2015, 06:01:05 PM »
बोलायचे असेल खूप काही..
सांगायचं असेल सगळं..
मनातलं..मनापासून..,
पण तुझ्या BUSY असण्यात राहूनच गेलं..
.
दाखवायची असतील
सगळी स्वप्नं
माझी,
माझ्या अवकाशातली..
मीच काळोख्या रात्री कधीतरी..
चांदण्यांसोबत सजवलेली कधीकाळी,
माझ्याच नजरेतून..,
पण
पण..
तुझ्या BUSY असण्यात सगळच राहूनच गेलं..
.
ऐकवायचे असतील माझ्या ह्र्दयातले
शब्द..
त्या शब्दांनीच गुंफली असती एक लकेर..
धुंद होउन गेली असती मने..
पण ..
राहूनच गेलं सगळं..
.
निसटले ते क्षण..
नाही पकडता आलं मुठीत त्यांना..
ऊरली फक्त एक रिकामी पोकळी..
राहूनच गेलं..
.
फुलवायचे होते मला..
मळे ..चंदेरी चांदण्यांचे..सोनेरी स्वप्नांचे,
गंधीत फुलांचे..
राहूनच गेलं सगळं..
.
तुझ्या नसण्यातच शोधलं अस्तित्व मी
तुझं..
तरी वाटतं ..
तू असतीस तर..
पण राहूनच गेलं..
जगणच राहून गेलं..
.
तुझ्यासोबत चालायच्या होत्या
आयुष्याच्या पाऊलवाटा..
एकट्यानेच  तुडवल्या त्या...निवडूंगांसोबत..
तुझ्यासोबत निशिगंधी सुगंध अनुभवायचं..
राहूनच गेलं..
.
राहूनच गेलं..
माझ्या थड्ग्यावर हवा होता ओलावा
मला..
तुझ्या दोन अश्रुंचा..
तुझे फक्त दोन अश्रु..
पण ..ते नव्हते तुजकडॅ..माझ्यासाठी..
.
मरताना शेवटचं..शेवटचंच अनुभवायचं होतं
तुला..
राहूनच गेलं..
तुझ्या नसण्यात ..
तुझ्या BUSY असण्यात..
सगळं राहूनच गेलं....

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता