Author Topic: मी होतो किनारा  (Read 678 times)

Offline amipat

  • Newbie
  • *
  • Posts: 4
मी होतो किनारा
« on: June 15, 2015, 09:15:34 PM »
 

 मी होतो किनारा आणि ती होती उधाणलेली लाट
थांबवावं वाटलं खूप तरी निसटून जायची स्पर्श करून   .

येताना यायची धावत,खळखळत अल्लड मुलासारखी
जाताना जायची माझ्याजवळ आठवणींचे शिंपले सोडून

तिचं येणं  ,कधी अलगद कधी बेभान होऊन आदळणं
झिजवत होतं मला कणकण जाणीव करून देत होतं काय ठेवलय वाढून

आता उरलोय कणाकणातून , अंगावर घेऊन भरावाची ओझी
आठवणींचे मोती घेऊन उरलोय तळाशी तिच्या परत येण्याची आशा घेऊन  ……………


Marathi Kavita : मराठी कविता