Author Topic: आता तुला ही मी मुकणार ..  (Read 867 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
बघ ना पिल्या डोळ्यामध्ये
आज आले आहे पाणी...
.
बघ ना पिल्या डोळे उघडून
मी खूप ग रडतोय...
.
सोडून मला जातेस कुठे तू
विचार न केला माझा...
.
खरंच तुझ्या शिवाय नाही कुणी
जगात माझे पिल्या...
.
भिऊ नकोस सोबत आहे
मी म्हणणारे ही आता
कुणीच नाही ....
.
ये ना पुन्हा माझ्यासाठी
सारे विचित्रच घडतंय
साऱ्याच वाटा सुन्या झाल्या...
.
तू निघून गेलीस
वाटेवरच्या ज्या फुलाला
तू रोज पहायची
ते ही हळूहळू कोमेजू लागलंय...
.
उघड ना डोळे पिल्या
बघ ना दुनिया मला छळते
एकटे पाहून सारेच मला
आज ठेचाळते....
.
करून एकटे मला तू
जाऊ नको ग एकटी
म्हणायची तू मला जाणार नाही सोडून
श्वास आहेस माझा तू
कसे मधेच तू ग सोडणार ..
.
नको ग जाऊ पडून एकटे
जगू न मी शकणार
सगळ्यांनाच मी विटलो
आता तुला ही मी मुकणार ..
.
स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref