Author Topic: तुजविन  (Read 770 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
तुजविन
« on: June 24, 2015, 09:05:00 AM »
तुजविन
*********************************
तुझी याद मला ही
          छळते पुन्हा पुन्हा
प्रेम केले तुझ्यावर
          हाच माझा गुन्हा

आता मी न राहिलो माझा
                कसा विसरू सांग तुला
तुझ्या अचानक जाण्यान
                 जगने मुश्किल झाले मला

कसा सावरु सांग स्वताःला
               तुझा विरह जाळते जीवाला
काय दोष होता मझा
              मज सोडुन गेलीस एकट्याला
*********************************
(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता


sk kaju

  • Guest
Re: तुजविन
« Reply #1 on: June 24, 2015, 05:07:02 PM »
हळूच तुला चोरून बघायचंय,
नजरेशी थोडं खेळायचं,
थोडं अवघड आहे रे …
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय !!
तुझ्यावर थोडं रुसायचंय,
मनवन्याच्या प्रयत्नात तुझं प्रेम मिळवायचंय
थोडं अवघड आहे रे …
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय !!
तुझ्याशी बोलताना शब्दांमध्ये अडकायचंय,
खांद्यावर डोकं टेकवून मन हलकं करायचंय,
थोडं अवघड आहे रे …
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय !!
त्या उगवत्या सूर्याला भेटायचंय,
तुझ्या हातात हात घालून त्यालाही थोडं जळवायचंय,
जरा अवघडच आहे हे …
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय !!
तुलाही एकदा मनवायचंय,
पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय,
थोडं अवघड आहे रे …
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय !!
kajal salunke ……. smile emoticon smile emoticon smile emoticon