Author Topic: सांज  (Read 679 times)

Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
सांज
« on: June 28, 2015, 01:21:04 AM »
सांज ही आली पुन्हा, .....रंग नवे घेऊनी..!
आकाश ही सजले आहे, .....साज नवा लेऊनी...!
साक्ष होते ते ही कधी,.....तुझ्या माझ्या प्रेमाची...!!

सळसळणारा वारा,....सागरी किनारा, आणि...
पुन्हा तोच सूर्य,.....जगाचा निरोप घेणारा...!!
सगळं तसच आहे,.....फक्त तु नाहीस...!!

क्षणभर मिटले डोळे,.....क्षणातच मनी आभाळ दाटले..!
आसवांनी ओल्या पापण्या,.....अन् ओठांवरचे हसू...!
एकाच वेळी येण्याचे, ....हेच तर कारण असते..!
बंद डोळ्यांच्या मागे, ......जेव्हा भेट तुझी होते.!

भान राहीले न् माझे मला,.....वाट प्रेमाची चालता..!
विसरून मी स्वत:ला,.....शोधते रे फक्त तुला..!
          फक्त तुलाच,..... मी शोधतेय..!


अर्चना...!

Marathi Kavita : मराठी कविता