Author Topic: केव्हा तरी व्हावे असे...  (Read 1563 times)

Offline Archana...!

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
केव्हा तरी व्हावे असे...
ओढ लागावी तुलाही माझी,
आस जागावी पुन्हा भेटीची,
तगमग ही जीवाची जाणवावी तुलाही......केव्हा तरी..!!

केव्हा तरी व्हावे असे...
न यावी निज तुलाही,
आठवांसवेत माझ्या,
घेऊनी चांदण्या कुशित,
रात तुही जागवावी........केव्हा तरी...!!

केव्हा तरी व्हावे असे...
पापणी भिजावी तुझीही,
ओघळणार्या आसवांत
प्रीत माझी भिजावी
त्या आसवांचे मोती तुही झेलावे........केव्हा तरी...!!

केव्हा तरी व्हावे असे...
भेट तुझी नी माझी घडावी,
दुभंगलेली ती पायवाट पुन्हा एक व्हावी,
विसावून मग तुझ्या मिठीत,
मी ही दुनिया सारी विसरावी.....केव्हा तरी...!!

केव्हा तरी वाटे असे...
गीत व्हावे मी ही कधी
तुझ्या ओठांचे,
एकांती क्षणी कधी जे,
तु ही गुणगुणावे...... केव्हा तरी...!!

केव्हा तरी येते मनी...
गंध प्रेमाचा पुन्हा दरवळावा,
नव्याने पुन्हा हात हाती तुझ्या द्यावा,
ऋतु प्रेमाचा तो पुन्हा बहरावा....केव्हा तरी...!!


अर्चना...!
(तुझ्या कडून मिळालेले, प्रेमाचे क्षण आयुष्यभर
जपेन मी)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sanju.....

 • Newbie
 • *
 • Posts: 15
Re: केव्हा तरी व्हावे असे...
« Reply #1 on: July 31, 2015, 12:57:12 PM »
तुझ्या कडून मिळालेले, प्रेमाचे क्षण आयुष्यभर
जपेन मी.......सुंदर

Offline Prem Mandale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
Re: केव्हा तरी व्हावे असे...
« Reply #2 on: August 06, 2015, 06:19:01 PM »
केव्हा तरी व्हावे असे...
भेट तुझी नी माझी घडावी,
दुभंगलेली ती पायवाट पुन्हा एक व्हावी,
विसावून मग तुझ्या मिठीत,
मी ही दुनिया सारी विसरावी.....केव्हा तरी...!!   

। खुप छान :)