Author Topic: अधूरे प्रेम.....  (Read 1033 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
अधूरे प्रेम.....
« on: July 06, 2015, 02:33:31 PM »
अधूरे प्रेम.....

तुझ्या माझ्या प्रेमाला
गालबोट लावणार नाही
सुखी तुझ्या संसारात
डोकावून पाहणार नाही

कधी वाट चुकली वाटेची
तुझ्या घराकडे फिरकणार नाही
नजर चुकवून जाइन तुझी
माझा चेहरा आठवू देणार नाही

आपण पाहिलेल्या स्वप्नाना
अंकुर फुटू देणार नाही
माझ्या अस्तित्वाची चाहूल
तुला भासू देणार नाही

काय गुन्हा होता माझा
जाब तुला विचारणार नाही
प्राण गेला तरी बेहत्तर
माझा आत्मा तुला सतावणार नाही

      कवी
(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता