Author Topic: माझं मन  (Read 838 times)

Offline sk kaju

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Female
माझं मन
« on: July 10, 2015, 04:41:44 PM »
मन हे माझं… कुणासही न कळलेलं…
कधी खळखळून हसलेलं, तर कधी मुसमुसून रडलेलं…
कधी अचानक थांबलेलं, तर कधी बेलगाम धावत सुटलेलं…
कधी आकाशात उंचच उंच उडालेलं, तर कधी धाड्कन जमिनीवर आदळेलं…
कधी स्वतःच्याच विश्वात रमलेलं, तर कधी वास्तवाचे चटके सोसलेलं…
कधी बेधुंद जगलेलं, तर कधी स्वतःला कोंडून घेतलेलं…
कधी चिंब भिजलेलं, तर कधी गारठलेलं…
कधी कुणासही न भ्यालेलं, तर कधी अचानक घाबरलेलं…
कधी कुणाची आठवण काढून रमलेलं, तर कधी कुणी आठवण काढत नाही म्हणून रुसलेलं…
कधी कुणाला तरी विसरलेलं, तर कधी कुणाला तरी कायमचं जपलेलं…
कधी दुखावलेलं, तर कधी खुद्कन हसलेलं…
           sk_kaju
« Last Edit: July 10, 2015, 04:52:46 PM by sk kaju »

Marathi Kavita : मराठी कविता