Author Topic: आठवणीचा किनारा  (Read 815 times)

Offline Mangesh Kocharekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
आठवणीचा किनारा
« on: July 10, 2015, 09:27:07 PM »
 

माझ्यासाठी तो किनारा अन सागर परिचित होता
किना-यावरील अदृष्य खुणा अजूनही स्मृतीत होत्या
    उसळणाऱ्या त्या निर्मळ लाटा अन फेसाळणारे पाणी
    मज अजून आठवत होती आम्ही गुण गुणलेली गाणी
त्या वाळूवरची हळवी स्पंदने कुणा कुणाची होती 
इथेच जमली होती दृढ भावपूर्ण टी प्रेमळ मैत्री
    त्या कटू गोड क्षणाच्या झलका सागरात मावत नव्हत्या
    आठवणींचा निरोप घेवून लाटा मजकडे धावत होत्या
त्या अथांग सागरापाशी माझे-त्याचे आगळे नाते होते
मी गत आठवणी उजळण्यासाठी सागरापाशी निघते
    निशब्द असे ते गाणे मी डोळे मिटुनी गुणगुणते
    काळाचा पडदा फडत मी मी मागे मागे फिरते
त्या धावणाऱ्या लाता मज स्प्रशुनी पुन्हा खुणवती
आठवणींचे शहार क्षणात नस नसात जागृत  होती
   मी झप झप मागे फिरते श्वास आवेगाने घेते
   ज्या मनी कोंडल्या जखमा त्यांनाच आलिंगन देते
पावले न  परतू पाहती परी न  थांबणे आता आहे
तुज गुपित ठावुक आहे परी न  कुणास सांगणे आहे
   त्या प्रेमाच्या काव्याची ओळख इथेच झाली होती
   तुलाच साक्षि ठेवत मी प्रीत रीत निभावली होती  

Marathi Kavita : मराठी कविता