Author Topic: तुझ्याशिवाय  (Read 2777 times)

Offline Mayoor

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Male
तुझ्याशिवाय
« on: December 09, 2009, 06:56:27 PM »
तुझ्याशिवाय  

माझं आयुष्य
वजा तू
फक्त एक शून्य

तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजतचं नाही

प्रत्येक पावलागणिक
तुझा विचार असतो
तू नाहीस
ही कल्पनाच
मी करत नाही.

तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजतचं नाही

मी खूप भांडतो तुझ्याशी
पण त्याच्या कित्येक पटीने
प्रेम करतो तुझ्यावर
नकळत दुःखवले जातो आपण
मी मुद्दाम तसं करत नाही

तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजतच नाही

मला ही आयुष्याची
वाट चालायचीय अजून
पण तू हवीस
तू नसशील तर मला
हे चालणेच नकोय
देवाकडे दुसरं काही
मागत मी नाही

तुझ्याशिवाय जगणं
मी जगणं समजत नाही.


-अनंत रेळेकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amitdabekar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: तुझ्याशिवाय
« Reply #1 on: December 09, 2009, 07:25:34 PM »
good one

Offline Parmita

  • Jr. Member
  • **
  • Posts: 249
Re: तुझ्याशिवाय
« Reply #2 on: December 10, 2009, 02:58:00 PM »
chann ahe..