Author Topic: आज तुझी खुप आठवण येतेय. ...  (Read 1548 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आज तुझी खुप आठवण
येतेय .....
,
हा येतेय मला तुझी आठवण
पण अजुनही मला तुझ्यावर राग  आहे
कारण तु मला सोडून त्या
देवाकडे निघून गेली. .
का टाकुन गेली मला एकट्याला सांगना ...
आज तुझी खुप आठवण येतेय
.
बघ ना तुझी मैत्रीची जागा अजून तसीच आहे कुणालाच नाही दिली आणि देणार ही नाही ..
कारण तु परत येशील या
आशेवर .. म्हणून
आज तुझी खूप आठवण येतेय
.
कुणी दुखावले का तुझी आठवण येते
कारण कुणी नाही विचारत काय झाल आज शोन्याला का नाराज
आहे . 
आणि तु जवळ घेऊन माझी समजूत काढायची .
पण आज कुणीच नाही समजुत
काढायला म्हणून ....
आज तुझी खूप आठवण येतेय ..
.
आज कुणाला सांगून पण कळत
नाही ग कृतीका ...
तु माझ्या मनातलं अगदी सहज
ओळखायची ...म्हणून
आज तुझी खुप आठवण येतेय. ..
.
आज दिवसभर काही खाल्लं
नाही पण कुणी खाऊन घे
म्हणणार नाही ..
आठवत  मला मी उपाशी
असल्यावर
तु तुझ्या डब्यातून मला तुझ्या
हाताने घातलेला घास ,
आणि आज परत तुझ्या हाताने
खावा वाटतय ... म्हणून
आज तुझी खुप आठवण येतेय...
.
खुप एकटा पडलो मी
प्रत्येक अडचणीच्या वेळी तु
दिलेली साथ ,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तु दिलेला हात  ...
आणि आज पुन्हा तो हात
हवा हवासा वाटतोय ..म्हणून
आज तुझी खुप आठवण येतेय. ..
.
पण
मी तुझ्यावर अजूनही रागावलो
आहे.
कधीच  माफ नाही करणार तुला
मी फक्त तिरस्कार करतो तुझा
कारण तु मला या मैत्रीच्या वाटेवर एकट टाकून निघून गेली. ..
तरी पण .....
आज तुझी खूप आठवण येतेय. .
.
परत आयुष्य कुणाशीच मैत्री
नाही करणार. ..
I Hate Friendship ...
I Hate You ....
But ....
I Miss you. ... Krutika
.
स्वयलिखीत :- Prem Mandale