Author Topic: घुसमट  (Read 1110 times)

Offline Sanju.....

  • Newbie
  • *
  • Posts: 15
घुसमट
« on: July 30, 2015, 01:32:52 AM »
 
घुसमट

तुला हवा हवासा वाटनारा मी
नकोसा कसा झालो?
श्वास होतो ना मी तुझा
जड़ कसा झालो?

कधी तूझ्या शृंगाराच कारण
होतो मी
आज तूझ्या चरित्र्यावरचा
डाग कसा झालो?

कधी तुझी सर्वात पहिली
आवड मी
मग तीरस्कार कसा झालो?

कधी तूझ्या डोळ्यातला प्रकाश
होतो मी
तूझ्या आयुष्यतला अंधार
कसा झालो?

मीठी माझी होती घट्ट
विरहाच्या भितीपोटि
माझ्या नकळत ती
तुझी घुसमट झाली.


                          संतोष.
                   

Marathi Kavita : मराठी कविता