Author Topic: क्षण तो प्रेमाचा  (Read 1230 times)

Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
क्षण तो प्रेमाचा
« on: August 09, 2015, 01:01:16 AM »
क्षण तो भेटीचा, शेवटचा ठरलेला,
जणू अजूनही आहे तो, डोळ्यांत साठलेला,
क्षण तो प्रेमाचा....!!

भिरभिरते मन, शहारते तन,
जणू समोर तू अन्, पाऊस दाटलेला,
क्षण तो प्रेमाचा...!!

थांबले होते जणू ते आकाश, तारे, जमीन, वारे..!!
जणू श्वासही होता थांबलेला...
क्षण तो प्रेमाचा...!!

उलटून गेले कित्तेक पावसाळे
क्षण तो अजूनही आहे भिजलेला...
क्षण तो प्रेमाचा...!!
शेवटचा ठरलेला...!!

अर्चना..!!

« Last Edit: August 10, 2015, 12:59:04 PM by Archana...! »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
Re: क्षण तो प्रेमाचा
« Reply #1 on: August 09, 2015, 06:00:01 AM »
खुप छान
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

YADAV1997

  • Guest
Re: क्षण तो प्रेमाचा
« Reply #2 on: August 12, 2015, 11:46:50 AM »
khurch channnnn majhya aayushyatahi asch ghadal.