Author Topic: असच काही.......  (Read 1477 times)

Offline Sanju.....

  • Newbie
  • *
  • Posts: 15
असच काही.......
« on: August 09, 2015, 08:08:49 PM »
तिनेही प्रेम कराव असा
मी हट्ट का धरावा?
होत तिचं प्रेम माझ्यावर आता नाही
ह्याचा राग मी का धारावा?

कदाचित तीला माझा स्वभाव
सुरवतीला उमगला नसावा
दिवसें दिवस होणाऱ्या भेटीं नंतर
कळाला असावा.

इतक्या वर्षात खूप काही
झोळीत पाडून घेतलं
मग आता "नाही" ह्या
शब्दाला कसं नाही म्हणायचे.

बरोबर असताना हिशोब
नाही ठेवले मग आता
दिलं काय आणि घेतलं काय
ह्याचा हिशोब कशाला?

ते पाखरू आलं स्वतःच होतं
गेलही स्वतःच, मन बसलं
त्याच्यावर पण मग पिंजरा कशाला?

वाटलच कधी तर येईन
ना परत ते
मी त्याचं स्वातंत्र्य हिरावु कशाला?

                                 
                                           संतोष.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Eshimane

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: असच काही.......
« Reply #1 on: August 18, 2015, 10:29:44 AM »
I will not disappoint after I finished reading.
sbo
« Last Edit: June 06, 2017, 10:44:28 AM by Eshimane »

Offline Sanju.....

  • Newbie
  • *
  • Posts: 15
Re: असच काही.......
« Reply #2 on: September 05, 2015, 10:01:19 PM »
Thanks