Author Topic: फक्त त्याच्याच आठवणींत  (Read 1105 times)

Offline sk kaju

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Female
आज परत एकदा त्याला पहावस वाटतय,

त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगवावस वाटतय,

त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन,थोडा चालावस वाटतय,

अन परत एकदा त्याला बघावस वाटतय...

आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय,
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोरबसावास वाटतय,
अन आपलं कोणीच नाही,
म्हणून,
आरश्या समोर बसून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...

आज मला परत भूतकाळात जावस वाटतय....
परत एकदा,
त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय......

फक्त त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय........

@sk_kaju@