खरच काही स्त्रीया अश्या असतात की, त्यांना कधीच प्रेमाचा सल लाभत नाही.
अखेर त्यांना आपल्या हृदयाची दारे बंद करावी लागतात.
त्यांनी आपल्या हृदयाची दारे बंद करण्या आधी,
मला त्यांच्या बद्दल झालेल्या शब्दरुपी जाणीवेचा एक छोटासा प्रयत्न...
कुणास मी माझे म्हणावे
कुणाची वाट पाहून दार उघडावे
गळुन जाईल मन आतुर होऊनी
पहावयास यातना कुणी नसावे
घेते आसवांना मी पदरात बांधुनी
आठवणीत तयांना मी वेचणार आहे
ना कुणी देणार मज हात आशेचा
ना छेडणार मज कुणाचा प्रेम कवडसा
मी एक अशी अभागी आहे
माझ्या हृदयाचे दार आज बंद आहे...
माझ्या हृदयाचे दार आज बंद आहे...
-सुनिल संध्या कांबळी.
snl_1408@yahoo.com