Author Topic: विरह बोल  (Read 877 times)

Offline Sona_sush

  • Newbie
  • *
  • Posts: 3
विरह बोल
« on: September 01, 2015, 01:57:05 PM »
नाराज असते मी, जेंवा सोबत तू नसतोस
ओठावर येते हसू ,जेंवा तू हसतोस

कितीही रागावलास तरी खूप प्रेम मला तू करतोस
मी रडताना फक्त तूच मला हसवतोस

एकटी वाटले मला कि, शब्दांच्या मीठीत घट्ट तू पकडतोस
तुझ्या प्रेमळ बोलण्याने छान समजूत काढतोस

सांग ना मला ,किती माझ्यावर प्रेम करतोस
 पण इतक दूर का रे तू राहतोस

जास्त प्रश्न विचारले कि मी फार बोलते म्हणतोस
फक्त एवढच सांग , कायमच माझ्याकडे कधी रे येतोस ?

- सोनाली सुशांत बिर्जे

Marathi Kavita : मराठी कविता