घेतले होते नवीन घर
न घेता कुणाचा पैशापायी आधार
नाही ठेवले डोई कर्जाचा भार
पण काळानेच हिसकावले
त्याचे ते घर दार
आता कुठ गाडी रुळावर होती
त्यात पुन्हा हे अस्सं
होई जीव कासावीस
बांधू घर पुन्हा कस...?
का घेरले काळानी
त्याच्या घर दारास,
केला आयुष्यात त्याच्या
संसाराचा नास,
आता नाही जाई सुखाने ते दिस
आता कुठ गाडी रुळावर होती
त्यात पुन्हा हे अस्सं
रोज रोज घेउनी ती डोळ्यावर आस
आता नाही आधाराला कुणी आस-पास
कधी कधी वाटे घेऊया गळ्याला तो फास
उरला नाही मनात धीर तो जरासं
आता कुठ गाडी रुळावर होती
त्यात पुन्हा हे अस्सं
पण कधी मानली नाही हार
पुन्हा कष्टाने लावला तो जोर
आता कुठ गाडी रुळावर होती
त्यात पुन्हा हे अस्सं
आता कुठं आल त्याच्या चेहर्यावर हास्य
त्याच्या जिद्दीला पाहून तोंडी आलं शाब्बास...!!!
कवि :- रवि सुदाम पाडेकर
- 8454843034.