Author Topic: तुझी आठवण येते  (Read 1208 times)

Offline abhishek panchal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
तुझी आठवण येते
« on: September 16, 2015, 10:32:54 AM »
   तुझी आठवण येते


ढगांप्रमाणे कंठ दाटूण येतो
पाण्याऎवजी अश्रुंचा पाऊस येतो
सारे त्यात चिबं भिजुन जाते

जेव्हा तुझी आठवण येते

गोड – गोड क्षणांनी हसु येते
कधी अचानक रडु कोसळते
सारं नुसतं बैचेन होउन जाते

जेव्हा तुझी आठवण येते

मनाच्या कोपऱ्यात असा साठा असतो
थोडा नाही तर खुप मोठा असतो
सापडत – सापडत माझी तिथे नजर जाते

जेव्हा तुझी आठवण येते

तुझ्या असण्याचे भास होतात
रात्री पाठोपाठ दिवसही निघुन जातात
तरी तुझ्या येण्याची आस राहते

जेव्हा तुझी आठवण येते

सारंकाही माहित असुन
तु माझ्यासोबत नसुन
तुझ्या असण्याची हाक येते

जेव्हा तुझी आठवण येते

जगण्याची शिक्षा झालीय
सुखाची वाचा गेलीय
तरी जगण्याची आस राहते
कारण अजुनही तुझी आठवण येते . .   

                 - अभिषेक पांचाळ

Marathi Kavita : मराठी कविता