Author Topic: आता कुठे....  (Read 655 times)

Offline Shri_Mech

  • Newbie
  • *
  • Posts: 48
  • Gender: Male
  • प्रेमात लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणं अवघड असतं
आता कुठे....
« on: September 20, 2015, 01:20:40 PM »
आता कुठे....

आता कुठे,
रुतु बहरत होते,
नवी पालवी फुटत होती,
स्वप्न नवे साकारत होते
अन् नेमकी आताच तू दूर चाललीयेस...

आता कुठे,
सुधारत होतो स्वतःला,
सांभाळत होतो मनाला,
अनुभवत होतो सुखाला,
अन् नेमकी आताच तू दूर चाललीयेस...

असं कसं गं प्रिये...

का अंत पाहतीयेस...?
का डोळे सुकवतीयेस...?
का सरणावर पाठवतीयेस...?
का गं प्रिये...? नेमकी आताच का दूर चाललीयेस...?

Shri_Mech
Shri_Mech

Marathi Kavita : मराठी कविता