Author Topic: मरण माझ्या शेतकऱ्याच  (Read 534 times)

मरण माझ्या शेतकऱ्याच
« on: September 25, 2015, 11:23:51 AM »
कवी :तुषार भारती...
(आत्महत्या करायला चाललेल्या शेतकऱ्यांची कविता , रचताना काही गावठी शब्द आठवत नसल्यामुळे तशीच रचलि आहे तरी मी माझ्या परीने एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे)

####कविता####

त्या नभाने या भुईला आज दान दिले
माझीया शेतकऱ्यास जगण्याचे थोड़े वरदान दिले....
नव्या उमेदिने पुन्हा माझ्या 'सर्जास' नांगरासी जुंपले,
ओलावलेले डोळे आज पुरे रीते केले...
त्या नभाने या भुईला आज दान दिले........।।

रीतं कर रे तुझं ते काळं ढग,
'आंन' तुला या काळ्या मातीची..
मह्या पोरांच्या उपाश्या पोटाची,
अर्ध्या भाकरीसही तू काल असे रडवले,
पोराची खळगी भरून , कारभारणीने सवताला मात्र  उपाशीच  झोपवलेे....।।

उभं पिकही गेलं रे पुरं  वाया.
दुस्काळाच्या उंबरीच करपली रे ही काया...
तुझ्यासंव माझं कसलं रे हे असलं नातं,
कोरड आणूनि घशास उघडच करितो तू हा रक्तपातं....।।

घरची चुल काय यळवर पेटना...
मह्या लेकीचं पुस्तक आज एक 'शबुद' बोलना
पोराचही इवलं हात आज करी रोजंदारी....
सवकारी पाश फेडता-फेडता बाप म्या दरोदारी...।।

दोर नर्डीला लावताच ,
दोन टीपूस आज गालावरी पडले,
वर पाहताच ढग बी हसले...,
त्या नभाने या भुईला आज दान दिले
माझीया शेतकऱ्यास जगण्याचे थोड़े वरदान दिले....


....╔══════V════ ═
════════════╗
·•·.·´TUSH¯`·.•·
अनामिक ♫♪
·•·.·´¯`·.•·
╚════════════ ════════════╝
(¯`V.´¯)
`•.¸T.•´
☻/
/▌Marathi Kavita : मराठी कविता