Author Topic: उकिरडा  (Read 544 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
उकिरडा
« on: September 28, 2015, 09:21:28 AM »
दमलोय, इतिहासातील जुना उकिरडा उखरून उखरून
थकलोय, त्याच त्या जुन्या आठवणी आठवून आठवून !

एकेकाळी उच्चवर्णीयांच्या पूर्वजांनी माझ्या पूर्वजांना छेळले
अरे, जे हागतांनाही माझे नाव काढित नाही
त्यांनाच शिव्या श्राप देण्यास माझे सर्वस्व वळले !

इतिहासातील कूजक्या आठवणीला स्मरून मीही सडून जात आहे
प्रगतीच्या प्रवाहात न जाता अधोगतीच्या प्रवाहातच मी वाहत आहे !

आमचे पूर्वज वीर, आमचे पूर्वज शूर, आमचे पूर्वज येथील राजे
अरे गाढवा ! आज जे आपल्यावर राज्य करतात त्यांच्यात रक्त ना तुझे ना माझे !

सनातनी वावटळात गोल गोल फिरण्यापेक्षा
इतिहासाचा  उकिरडा शोधण्यापेक्षा
चल एक नवीन प्रकाशवाट शोधू
आणि त्या नवप्रकाशात नवीन ध्यास धरू
एकात्मकतेचा, प्रेमाचा, जाती धर्माच्या पलीकडचा !

संजय बनसोडे 9819444028

Marathi Kavita : मराठी कविता