Author Topic: नादान झाल्यावर .....  (Read 684 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
नादान झाल्यावर .....
« on: October 14, 2015, 09:58:23 PM »


नादान झाल्यावर
कुणाला समजवण्यात
काय अर्थ असतो
हात हिसडून गेल्यावर
कुणाला थांबवण्यात
काय अर्थ असतो
ते जात आहेत बेगुमान
निर्ढावलेल्या मनानं
पैश्याच्या चमचमत्या
काळ्या डोहाकडे
देह्सुखाच्या क्षणिक
उथळ डबक्याकडे 
किती अवघड असतं
जिवलग मित्रांची अशी
घसरण पाहतांना
समोर दिसतो आहे
दु:खाचा असमाधानाचा
अपरिहार्य महासागर
पण त्यांनी डोळे मिटले आहे
ते जणू तरंगत चालले आहे
धनगंधाच्या हवेवर 
अन मला इच्छा असून
प्रार्थनाही करता येत नाही
ते सुखी राहावे म्हणून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता