Author Topic: सुर सुन्या मैफिलिचे  (Read 913 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
सुर सुन्या मैफिलिचे
« on: October 27, 2015, 01:41:17 AM »

तुझ्या असण्यात असतात ग, भाव गहिरे मोहाचे..
तुझ्या नसण्याने वाहतात ग, अश्रु वेदनेच्या डोहाचे..!!

तुझ्या असण्यात खुलतात ग, भाव चंद्र तारकांचे..
तुझ्या नसण्याने भूलतात ग, ढग काळे शंकांचे..!!

तुझ्या असण्यात फ़ुलतात ग, फुल पाने सृष्टीचे
तुझ्या नसण्याने सलतात ग, काटे नसत्या गोष्टीचे..!!

तुझ्या असण्यात नादतात ग, स्पंदने लयीत हृदयीचे..
तुझ्या नसण्याने भासतात ग, सुर सुन्या मैफिलीचे..!!
*******सुनिल पवार......

Marathi Kavita : मराठी कविता


pranali rokade

  • Guest
Re: सुर सुन्या मैफिलिचे
« Reply #1 on: November 07, 2015, 03:40:53 AM »
mast :)

Re: सुर सुन्या मैफिलिचे
« Reply #2 on: November 11, 2015, 04:39:49 PM »
Chhan...