आई
म्हणता म्हणता वर्ष झाले
आई तुला जाऊन
तरीही एकही दिवस न गेला
तुझ्या आठवणी वाचून
आई गेली ती पुन्हा कधीच येणार नाही
आईचा शब्द हि कानी पडणार नाही
आई विना निवारा उरणार नाही
दु:ख आईच्या जाण्याचे कधी विसरणार नाही
तुझी मूर्ती, तुझ हसणं, तुझ बोलणं, तुझ वागणं
लक्षात आहे कस भरभरून दिलस प्रेम
एवढी हि आशा न करिता
आम्हालाच नव्हती पर्वा
कळल मोल तू जाता जाता
एकदाच मार हाक आई
कधीच नकार देणार नाही
माझी व्यथा आईलाच कळणार होती
दुसऱ्या तिसऱ्याला कळणार नाही
काय मागू देवाजवळ आता
त्याला माझी मागणी कळणार नाही
आईरूपी देवता माझी हरवली
देवाला ते कळणार नाही
आई असे अनमोल रत्न
जगाच्या बाजारात विकत मिळणार नाही
सौ. संजीवनी संजय भाटकर